Satish Dhade
हा माझ्या विचाराचे व्यासपीठ आहे.
मंगळवार, १६ जून, २०२०
अखिल भारतीय कोळी समजा संघटना एक राष्ट्रीय संघटना
अखिल भारतीय कोळी समाज संघटना ही संघटना मूलतः दिल्ली येथे स्थापन झाली .
या संघटनेचे राष्ट्रीय कार्यालय ही दिल्ली येथे आहे. सगळ्या देश भरातील एका जातीची सामाजिक संघटना ही प्रथमता स्थापन झालेली कोळी समाजाची ही संघटना आहे.
1967 ला ऑल इंडिया रेडिओ मध्ये तबला मास्तर या पदावर कार्य करणारे स्वर्गीय चेताराम यांनी या संघटनेचा शुभारंभ केला. चेतराम हे AIR all india radio मध्ये तबला मास्टर होते. 10 - 12 - 1967 या दिवशी तुळसी नगर दिल्ली येथे कोळी समाजातील मोजक्या सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक होऊन अखिल भारतीय कोळी समाज संघटना स्थापन अध्यक्ष म्हणून हिमाचल प्रदेश चे खासदार प्रतापसिंह उपाध्यक्ष लखपत राय आणि महामंत्री रामसिंह कोळी यांच्या कडे कार्यकारी मंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली. चेटराम यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली संघटनेची सुरुवात स्वतः करून सुद्धा त्यांनी कोणतीही पद घेतले नाही. यावरून त्याकाळातील लोकांच्या मनातील नैतिकता
,सामजिक हिताचा विचार आणि निस्वार्थी पणा किती सुंदर होता हे स्पष्ट होते .
दुसरी महत्वाची बैठक 24 12 67 ला झाली आणि देशभर ही संघटना नेण्याचा तसेच कोळी समाजासाठी मार्गदर्शक विचार पोचवणारे" कोळी संदेश" या नावाचे वृत्तपत्र काढण्याचा विचार कार्यकारी मंडळाने घेतला. या वृत्तपत्राचे संपादक म्हणून रामलालजी अत्री यांना निवडण्यात आले. या बैठकीत श्री प्रतापसिंह यांचे ऐवजी पूर्ण वेळ देता येईल अशा सीताराम जी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
मार्च 1968 ला विशेष अधिवेशन झाले त्यातही महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील एकही सदस्य अखिल भारतीय कोळी समाज संघटित नव्हता संघटनेचे अध्यक्ष यांच्यासह कार्यकारी मंडळातील सर्वांना ही संघटना अखिल भारतीय स्तरावर पोचली पाहिजे ,
कोळी समाजाच्या स्थानिक उन्नतीसाठी, विकासासाठी कार्य करणारी असावी हा उद्देश घेऊन सदरच्या बैठकीमध्ये दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये घेण्याचा निश्चय त्यांनी केला .
दि.26 6 1969 अकोला येथे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अखिल भारतीय स्तरावरील पहिले मोठे अधिवेशन झाले, मुंबईचे माजी महापौर बाबासाहेब वरळीकर यांच्या अध्यक्षतेत हे घेण्यात आले.
या अधिवेशनात विदर्भातील उत्तमराव पाटील हैदराबादचे लक्ष्मीनारायणजी नागपूरचे गोपाळराव गोविंदराव धोंडे हे महत्त्वपूर्ण नेते आणि दक्षिण भारतातील बरेच कार्यकर्ते सामील झाले. अशाप्रकारे ही संघटना महाराष्ट्रामध्ये आली .
1970 ला भारताचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे दिल्ली येथे वकिली करिता आले आणि त्यांचा संपर्क राम सिंह कोली, प्रताप सिंह महिपाल आर्य हेमराज आर्य रामस्वरूप जी यांच्याशी झाला आणि त्यांनीही अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली. रामनाथ गोविंद जी हे वकील असल्यामुळे त्यांनी ही संघटना कायद्यानुसार साठी पुढाकार घेतला आणि या संघटनेचे रजिस्ट्रेशन 1972 मध्ये झाले.1973 ला कर्नाटकातील खासदार बी चौधरी यांच्या अध्यक्षतेत मध्ये या संघटनेचे अधिवेशन झाले रामनाथ गोविंद साहेब हे त्यावेळेपासून अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या कार्यकारिणीत आहेत.
विद्यमान महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे तीन वेळा अध्यक्ष 1991 ला त्यांनी भारत मध्ये प्रवेश केला भाजपने त्यांना खासदार केले बिहारचे राज्यपाल केले आणि आज ते राष्ट्रपती आहेत.
गुजरातचे पशुपालन मंत्री कुमारजी भाई बावलिया हे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे तर आजही महाराष्ट्राचे अध्यक्ष हे कांतीभााई कोळी हेच आहेत, त्यांचा मुलगा परेश कोळी हा प्रदेश युवा अध्यक्ष आहे.
बाबासाहेब वरळीकर गोविंद गोविंद राव पाटील गणपतराव धोंडे सुलोचनाताई ठाणेकर यांनी जमेल त्या पद्धतीने अत्यंत कमी संसाधनाच्या साह्याने या संघटने चीे वाढ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
त्यांच्यानंतर कांतीभाई कोळी हे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि प्रभारी झाले त्यांनीही 1989 पर्यंत संघटनेचे कार्य चांगले केले बॅरिस्टर अंतुले यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी मनात आणले असते तर आज जो कोळी समाजाचा प्रसहन आहे तो राहिला च नसता.. पण प्रसिध्दी आणि पद आणि राजकारण चा चकणा खाला की माणूस बिघडतो तसच काहीस कांतिभाई यांचं झालं.
त्यांनी त्यांना आमदार केल्यानंतर कोळी समाजातील कार्यापेक्षा काँग्रेसच्या पक्षीय कार्यात त्यांनी जास्त रस घेतला आणि महाराष्ट्रातून संघटनेला उतरती कळा लागली . विकासाला ही गतिरोधक लागला . १९९४ - ९५ ला नागपूर अधिवेशनात मुख्यंत्री शरद पवार असताना गोवारी हत्याकांड झाले. आणि अनुसूचित क्षेत्र सोडून विस्तारित क्षेत्रातील आदिवासी कोळी जमातीला एसबीसी मध्ये ढकलण्यात आले. या हत्याकांड नंतर कांती कोळी यांनी कधीच कसलेही आंदोलन केले नाही. समाजाला जे नेतृत्व पाहिजे ते मिळत नसल्यामुळे समाजातील लोक आणि कार्यकर्ते विखुरले े गेले .आज ही संघटना नावापुरती राहिलेली आहे .
ठाण्याचे माजी महापौर शिवसेनेचे उपनेते माजी आमदार आनंत तरे यांना 1997 मध्ये संघटना विक्रीला समाज एकत्र करण्यासाठी लोकांच्या आग्रहास्तव करावी लागली. जर अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने तमाम महाराष्ट्रातील लोकांच्या विकासासाठी सामाजिक हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी कार्य केले असते तर महाराष्ट्र कोळी समाज संघ आणि आता कोळी महासंघ यासह अनेक संघटना महाराष्ट्र स्थापन च झाल्या नसत्या.
ध्येय धोरण आणि दिशा ही नेत्याकडे नसली की कोणताही पक्ष असो संघटना असो टिकत नसते हे आपण पाहतोच आहे.
एवढी जुनी संघटना अखिल भारतीय स्तरावरील संघटना, काही साधन संपत्ती नसताना तात्कालीन नेत्यांनी सामाजिक विकासासाठी स्थान देणारा एक मंच म्हणून निर्माण केलेली ही संघटना सामाजिक विकासाची जाण असल्याने कार्यक्षमता नसल्याने दोन-चार कार्यकर्त्यांच्या नावाने चालत आहे पश्चिम महाराष्ट्र सिद्धार्थ कोळी डी एम कोळी मराठवाड्यातील व्यंकट मुदिराज उत्तर महाराष्ट्र मध्ये सोनवणे खानदेश मध्ये गणेश कोळी नाशिक नांदेड ला बट्टे वाड सर असे हाताचे बोटावर मोजता येतील इतके कार्यकर्ते सोडले तर या संघटनेमध्ये कोणी राहिले नाही.
: हा लेख लिहिण्याच्या अगोदर मी अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे युवा अध्यक्ष परेश कोळी सिद्धार्थ कोळी आदी नेत्यांना याबाबत सविस्तर वृत्तांत सांगा मी यावर लेख लिहायचा विचार करतोय असे म्हटले तसेच लिखित स्वरूपात काही मेटर असेल तर द्या
व्हॉट्स ऍप वर पाठवा असे सांगितले होते त्यांनी फक्त फोटो पाठवल्या. काही कालानुरूप माहिती चां डाटा दिला तर हा लेख अजून समृद्ध करता आला असता.
सिद्धार्थ कोळी आणि फोटो पाठवून दिल्या पण आपल्या संघटनेचा इतिहास त्यानीही. सांगितलं नाही परंतु संघटनेत सध्या कार्यरत असलेले सहसचिव उत्तराखंडचे प्रभारी दयानंद कोळी यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी सगळ्यात जुना इतिहास सांगितला.
त्यामुळे मी इतका सविस्तर वृत्तान्त लिहू शकलो. त्याबद्दल दयानंद कोली संघटन सचिव आणि उत्तराखंडचे प्रभारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्रातला आंदोलनाचा सामाजिक कार्याचा संघात्मक कार्याचा इतिहास अनेकांना सांगता आला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज इतिहास विसरतो तो कधीही भविष्य घडू शकत नाही याची जाणीव असायला सामजिक संघटनेत कार्य करणाऱ्या प्रत्येकाला असायला पाहिजे , सुविचार फक्त वाचून आणि ऐकून सोडायचे नसतात अमलात आणावे लागतात, तरच वैयक्तिक आणि सामाजिक उन्नती होते.
हा संघटनेचा इतिहास डोळे फोडून लीहण्याचा, या ठिकाणी सांगण्याचा हाच उद्देश आहे की नवीन पिढीला प्रेरणादायी विचार वाचनातून डोक्यात शिरावे . यातून एक जी निस्वार्थ त्यागी कार्यकर्ता निर्माण झाला
तरी हा लेख लिहण्याची माझा उद्देश सफल होईल.
सतीश धडे - संपादक कोली समाज संदेश
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
अखिल भारतीय कोळी समजा संघटना एक राष्ट्रीय संघटना
अखिल भारतीय कोळी समाज संघटना ही संघटना मूलतः दिल्ली येथे स्थापन झाली . या संघटनेचे राष्ट्रीय कार्यालय ही दिल्ली येथे आहे. सगळ्या देश भ...